Breaking News
अल्पवयीन मुलांसाठी स्पेशल NPS वात्सल्य योजना लाँच ! आता मुलांच्या भविष्याची चिंता सोडा
निर्मला सीतारामन बुधवारी NPS वात्सल्य योजना लाँच केली
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १८ सप्टेंबर रोजी NPS वात्सल्य योजनेचा श्रीगणेश केला आहे ज्याची अलीकडेच २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केली होती. देशातील सर्व मुलांना मजबूत आर्थिक पाया प्रदान करण्याचा या योजनेचा उद्देश असून या कार्यक्रमात अर्थमंत्र्यांसह शाळकरी मुलेही सहभागी झाली होती तर, NPS वात्सल्य योजना सबस्क्राइब करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू केले जाईल. तसेच योजनेशी संबंधित तपशील जाहीर केले जातील आणि या योजनेत सामील होणाऱ्या अल्पवयीन ग्राहकांना अर्थमंत्री कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक (Permanent Retirement Account Number) सुपूर्द करण्यात आले.
NPS वात्सल्य योजनेत गुंतवणुकीचे तपशील
NPS वात्सल्य योजनेद्वारे पालक पेन्शन खात्यात गुंतवणूक करून मुलाच्या भविष्यासाठी बचत करू शकतील. दीर्घकाळात मोठा निधी या योजनेत चक्रवाढचा उपयोग केला जातो आणि यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. पालक आपल्या मुलाच्या नावावर वार्षिक १,००० रुपयांची गुंतवणूक सुरुवात करू शकतात ज्यामुळे ही योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचेल. ही योजना सर्वसमावेशकता आणि आर्थिक सुरक्षिततेला प्रोत्साहन देते.
NPS वात्सल्य योजनेचा लॉक-इन कालावधी काय?
या योजनेअंतर्गत तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर शिक्षण, गंभीर आजार आणि अपंगत्व यासारख्या गरजांसाठी जमा रकमेपैकी २५ टक्के रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली असून खात्यातून जास्तीत जास्त केवळ तीन पैसे काढले जाऊ शकते. केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये नियोक्त्याकडून कपातीचा दर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या १० टक्क्यांवरून १४% करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
NPS वात्सल्य योजनेचे प्रमुख फायदे
लहानपणापासून पेन्शन योजना: या योजनेमुळे मुले लहानपणापासून पेन्शन योजनेशी जोडली जातील.
दीर्घकालीन गुंतवणूक: दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास संपत्ती वाढण्याची शक्यता जास्त असते.
कर लाभ: या योजनेतील गुंतवणुकीवर कर लाभ मिळू शकतात.
लवचिकता: योजनेतील गुंतवणूकीची रक्कम आणि कालावधी लवचिकपणे निवडला जाऊ शकतो.
मुलाची मालकी: खाते मुलाच्या नावावर असल्यामुळे त्याचे स्वतःचे भविष्यातील निर्णय घेता येतील. १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मुल खात्यातून पैसे काढू शकते किंवा वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शन घेऊ शकते.
NPS वात्सल्य योजनेत तुम्ही गुंतवणूक करावी का?
योगदान मर्यादा वाढवल्याने कामगारांची सामाजिक सुरक्षा मजबूत होईल. NPS वात्सल्य योजना ही पालकांसाठी आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्याची उत्तम संधी असेल. लवकर सुरुवात करून आणि नियमित बचत करून, कुटुंबे त्यांच्या मुलांसाठी मोठी संपत्ती निर्माण करू शकतात. ही योजना सर्व वयोगटातील लोकांसाठी आर्थिक सुरक्षिततेच्या सरकारच्या संकल्पनेशी सुसंगत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE