Breaking News
उरले अवघे काही तास! लालबागच्या राजाची चरणस्पर्श आणि मुखदर्शन रांग होणार बंद
मुंबई - लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग बंद करण्याचा निर्णय लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने घेतला आहे. राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी दर्शनरांगा बंद होणार आहेत.
लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीच्या पूर्व तयारीसाठी लालबागच्या राजाची दर्शनरांग बंद करण्यात येणार आहे.
चरण स्पर्शची रांग ही उद्या म्हणजेच, सोमवार, 16 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 6 वाजता बंद करण्यात येणार आहे.
त्यानंतर मुखदर्शनाची रांग सोमवारी रात्री 12 वाजता बंद करण्यात येणार आहे.
उद्या सकाळी 6 वाजता चरणस्पर्शची रांग आणि उद्या रात्री 12 वाजता मुख दर्शनाची रांग बंद करण्यात येणार आहे.
नवसाला पावणारा राजा अशी ख्याती लालबागच्या राजाची आहे, त्यामुळे राजाच्या दर्शनासाठी देशभरातून नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
तासंतास रांगेत उभे राहून भाविक आपलं मागणं बाप्पाच्या चरणी मांडतात.
आता अवघ्या दोन दिवसांनी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीला वाजत-गाजत लालबागच्या राजाची मिरवणूक काढण्यात येईल.
आता बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला सुरूवात झाली आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी उद्यापासून दर्शनरांगा बंद होतील.
विसर्जनाला निघाल्यावर सर्व भाविकांना बाप्पाचं दर्शन व्हावं, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE