सैन्य भरती करण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुणांची फसवणूक करणाऱ्या बोगस आर्मी अधिकाऱ्याला अटक
सैन्य भरती करण्याचे आमिष दाखवून शेकडो तरुणांची फसवणूक करणाऱ्या बोगस आर्मी अधिकाऱ्याला अटक
मुंबई - राज्यातील तरुणांना रोजगार पुरेशा संधी उपलब्ध नाहीत, त्यामुळे गावखेड्यांतील होतकरू, सुशिक्षित तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट झाला आहे. अहमदनगरमधून असच एक बोगस सैन्य भरतीचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. मिलिटरी इंटेलिजन्स (MI) पुणे आणि नगरच्या भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनने मोठी करवाई केली आहे. याप्रकरणी आर्मी मेजर असल्याची बतावणी करणाऱ्या सत्यजीत कांबळेला श्रीरामपूरच्या बेलापूरमध्ये अटक करण्यात आली आहे. सत्यजित कांबळे हा आपल्या साथीदारासोबत आम्ही मेजर पदावर सैन्यात नोकरीवर आहोत, असे भासवून लोकांची फसवणूक करत होता.
महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सत्यजित भरतीचे रॅकेट चालवत होता. आरोपी इच्छुक उमेदवारांकडून प्रत्येकी 7 ते 8 लाख रुपये फी घेत होता. याद्वारे त्याने सुमारे 3-4 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आरोपी हा जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आला असल्याची माहिती मिळताच भिंगार कॅप पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी आरोपी सत्यजित कांबळे याला बेड्या ठोकल्या आहे.
सत्यजित कांबळेने आर्मीमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगत अनेकांची फसवणूक केली होती. तसेच महाराष्ट्रसह इतर राज्यातील तरुणांना भरती ट्रेनिंगला बोलावून त्यांच्याकडून वारंवार रक्कम घेण्यात घेऊन फसवणूक करण्यात आली होती. त्याने डेहराडून, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील श्रीगोंदा येथे बनावट प्रशिक्षण शिबिरे उभारली होती.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर