मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जिओ सिनेमा दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला भारी पडणार

जिओ सिनेमा दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला भारी पडणार 

सध्या ओटीटीचा काळ सुरू आहे. वेब सीरिजसोबतच  चित्रपट पाहण्यासाठीदेखील प्रेक्षक ओटीटीला प्राधान्य देत आहेत. काही चित्रपट हे थिएटरऐवजी थेट ओटीटीवर रिलीज झाले आहेत. डिस्नी प्लस हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्ससारख्या  ओटीटी प्लॅटफॉर्मचा चांगलाच द बदबा निर्माण झाला आहे. तर, मागील काही वर्षांपासून जिओ सिनेमाने आपलं वर्चस्व निर्माण केले आहे. 

Jio Cinema OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar मध्ये विलीन होणार असल्याचे वृत्त समोर आले. या विलीनीकरणामुळे जिओ सिनेमा एक मोठे युनिट तयार करणार असून त्याचा परिणाम ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे विलीनीकरण अद्याप झालेले नाही. पण याआधीही जिओ सिनेमाने ओटीटी उद्योगाला हादरा दिला आहे.

जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारच्या विलीनीकरणाने काय होणार?

जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टारच्या विलीनीकरणाने भारतात एक सिंगल मजबूत स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म तयार होईल. या युनिटमध्ये 100 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि दोन मेन ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा आणि डिस्ने प्लस हॉटस्टार असतील. या युनिटकडे रिलायन्स आणि Viacom18 च्या मालकीची क्रीडा कंटेट आणि Disney च्या कंटेंटचे भारतात वितरण करण्याचे अधिकार असतील.

जिओ सिनेमा ओटीटी इंडस्ट्रीला कसे हादरवले?

जिओ सिनेमाने विलीनीकरणाआधीच ओटीटी उद्योगाला हादरवले आहे. Binz नुसार, विवेक श्रीवास्तव, OTT प्लॅटफॉर्म Amazon प्राइम व्हिडिओ इंडियाचे ग्रोथ आणि बिझनेस हेड, आता जिओ सिनेमा हिंदीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड म्हणून पदभार स्वीकारतील.

दुसऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला भारी पडणार जिओ सिनेमा

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओमध्ये जबाबदारी सांभाळलेल्या विवेक श्रीवास्तव हे आपला अनुभव आणि स्ट्रॅटेजीसह जिओ सिनेमामध्ये आपली नवी इनिंग सुरू करणार आहे.  त्यामुळे जिओ सिनेमा हा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मसमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट