Breaking News
दोन सख्ख्या बहिणींनी दिली वनराज आंदेकरांच्या हत्येची सुपारी
ट्रेण्डिंग
पुण्यात रविवारी (1 सप्टेंबर) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. वर्चस्वाच्या आणि कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. पुणे पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांच्या मेहुण्यांना अटक केली आहे. वनराज यांची पाच गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करत हत्या झाली. वनराज यांच्या हत्येमागे त्यांच्या कुटुंबियांचाच हात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. भरचौकात हा सगळा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यात माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या: खळबळ
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आज त्यांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. पुण्याच्या के इ एम रुग्णालयात त्यांना नेले असता तिथे ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे .ते सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. ऐन गणेश उत्सवाच्या तोंडावर आंदेकर यांची अशा पद्धतीने हत्या झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हा चिंतेचा विषय होणार आहे राष्ट्रवादी पक्षाकडूनउमेदवारी मिळवून वनराज आंदेकर हे २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते . नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांची अत्यंत शांत नगरसेवक अशीच गणना होत होती, आज नाना पेठेत त्यांच्या राहत्या घराबाहेर त्यांच्यावर गोळीबार करून ४ ते ५ जन पळून गेल्याचे प्राथमिक वृत्त आहे..आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनराज यांच्यावर वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर