Breaking News
सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशमधील सरकारने मागितली हिंदूंची माफी
ढाका - बांगलादेशात सध्या भीषण अराजकता माजली असून येथील अल्पसंख्यांक हिंदू समाजाला आंदोलक लक्ष करत आहेत. त्यामुळे तेथील हिंदू नागरिक जीव मुठीत धरून दिवस कंठत आहेत. धार्मिक कट्टरतावादी बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करू लागले आहेत. हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांची त्यांची घरं पेटवली जात आहेत, मंदिरांची नासधुस-तोडफोड होत आहे. त्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंनी देखील आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, बांगलादेशमधील हंगामी सरकारमधील गृह विभागाचे सल्लागार शखावत हुसैन यांनी मान्य केलं आहे की त्यांच्या देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्यात बांगलादेशी सरकार व सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे. जनरल एम. शखावत हुसैन यांनी बांगलादेशमधील हिंदूंची माफी मागितली आहे. तसेच
शखावत यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगवर हिंसाचार पसरवण्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. शखावत हुसैन यांनी बांगलादेशातील हिंदू समुदायाची माफी मागितली आहे. सरकार त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची खंत हुसैन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “या सगळ्याला केवळ सरकारचं नव्हे तर येथील बहुसंख्याकांचा समुदाय जबाबदार आहे. तसेच आम्ही देखील आमचं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरलो आहोत. आता परिस्थिती आमच्या नियंत्रणात येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.
बांगलादेशमधील नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी आंदोलक करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही मोहम्मद युनूस यांनी दिली होती. त्यानुसार ते बांगलादेशला परतले व त्यांनी देशाची धुरा हातात घेतली आहे.मात्र ते अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार अद्याप थांबवू शकलेले नाही. बांग्लादेशातील या स्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
जनरल एम. शखावत हुसैन यांनी बांगलादेशमधील हिंदूंची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगवर हिंसाचार पसरवण्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. शखावत हुसैन यांनी बांगलादेशातील हिंदू समुदायाची माफी मागितली आहे. सरकार त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची खंत हुसैन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “या सगळ्याला केवळ सरकारचं नव्हे तर येथील बहुसंख्याकांचा समुदाय जबाबदार आहे. तसेच आम्ही देखील आमचं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरलो आहोत. आता परिस्थिती आमच्या नियंत्रणात येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे