Breaking News
भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश, उत्तर महाराष्ट्रातील ठेलारी समाजाला न्याय
राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील यादींमध्ये नवीन जातींचा समावेश करण्यात आला आहे. तर काही जातींना वगळण्यात आले आहे.
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील यादींमध्ये नवीन जातींचा समावेश करण्यात आला आहे. तर काही जातींना वगळण्यात आले आहे. नव्या बदलानुसार यापुढे “ठेलारी” ही जात ‘भटक्या जमाती (ब)’ यादीतील अ.क्र. 27 येथून वगळून ‘भटक्या जमाती (क)’ यादीतील अ.क्र. 29 मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर केवट-तागवाले या जातीचा भटक्या जमाती (ब) मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्ग यादीतील अ. क्र. 182 मधील माळी, बागवान, राईन (बागवान) समोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासनादेश मंगळवारी (ता. 06 ऑगस्ट) इतर मागास बहुजन कल्याण विभागाने जारी केला आहे.
आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने इतर मागास वर्ग यादीतील अ.क्र. 267 वर समावेश असलेल्या चुनारी जातीसमोर चूनेवाला, चूनेवाले या जातींचा समावेश केला आहे. “हडगर” या जातीचा समावेश ‘विशेष मागास प्रवर्ग’ यादीतील अ.क्र. 3 (1) कोष्टी जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात येत आहे. वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी ही पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड) क्रमांक (30) मध्ये समावेश करण्यात येत आहे. तर इतर मागास प्रवर्गातील अ.क्र. 226 वरील “भोयर” या जातीची आजमितीस असलेली दुबार नोंद वगळण्यात येत आहे, असे शासन आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, ठेलारी जातीचा धनगर जातीमध्ये समावेश करण्यात आल्याने धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची मंत्रालयात भेट घेऊन आभार व्यक्त केले. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, अनंत बनसोडे, विठ्ठल मारनर, वामनराव मारनपावबा गोयेकर, देवा गोयेकर, बापू कोलपे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे