Breaking News
घरटी बनविण्यासाठी सुगरणीची लगबग सुरू
वाशिम - सप्टेंबर पर्यंत विणीचा हंगाम असल्याने वाशीम जिल्ह्यातील रानमाळावर गवताचे पाते शोधणाऱ्या दुर्मिळ सुगरण पक्ष्यांचे होत आहे. नेहमीपावसाळ्याच्या दिवसांत सुगरण पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. धरतीने हिरवा शालू परिधान करताच या पक्ष्याला विणीच्या हंगामाचे वेध लागतात. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील रानमाळावर आणि ग्रामीण भागात सध्या विहिरीच्या काठावर असलेल्या झाडा झुडपावर सुगरण पक्ष्यांमध्ये घरटे बांधायची लगबग सुरू झाली आहे. सुगरण पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू झाल्याने विहिरीकाठच्या झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade