Breaking News
BSNL 5G चे टेस्टींग यशस्वी
नवी दिल्ली - खासगी टेलेकॉम कंपन्यांच्या रिचार्ज दरात मोठी वाढ होत असल्याने लोकांना आता सरकारी कंपन्यांची गरज भासू लागली आहे. BSNL 5G ची वाट अनेकजण पाहत आहेत आणि लवकरच सरकारी कंपनी नेक्स्ट जेन नेटवर्क सर्व्हिस लाँच करू शकते. कारण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे BSNL 5G चं टेस्टिंग करताना दिसले आहेत. सिंधिया यांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स (C-DOT) मध्ये जाऊन टेस्टिंग केली होती. नवी दिल्लीतील कँम्पसमध्ये BSNL 5G ची टेस्टिंग सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांनी BSNL च्या 5G टेक्नॉलॉजीचा वापर करून व्हिडीओ कॉल देखील केला.
या टेस्टनंतर स्पष्ट झालं आहे की लवकरच BSNL 5G नेटवर्क लोकांपर्यंत पोहोचेल. जो भारतीय टेलीकॉम सेक्टर मधील महत्वाचा क्षण ठरू शकतो. तसेच यामुळे खाजगी कंपन्यांची डोकेदुखी वाढेल हे मात्र नक्की. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सेंटरवर जाऊन टेक एक्सपर्ट्सशी यावर चर्चा केली आणि म्हटलं की आपल्याला फास्ट 5जी इंटरनेट उपलब्ध करण्यावर काम केलं पाहिजे.
केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी एक्सपर्ट सोबत मिटिंग केली आणि C-DOT मधील इतर गोष्टींची माहिती घेतली. त्यांनी देशातील शास्त्रज्ञ आणि टेक एक्सपर्ट्स सध्या कोणत्या गोष्टींवर काम करत आहेत, हे जाणून घेतलं. ग्लोबल टेक्नॉलॉजी इंडस्ट्री मध्ये भारताच्या स्ट्रॅटेजी बाबत देखील त्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी म्हटलं की की भारतात नवीन टेक्नॉलॉजीवर काम केलं जात आहे आणि लवकरच संपूर्ण जग नवीन टेक्नॉलॉजीसाठी भारताकडे पाहील, असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला.BSNL आंध्र प्रदेशने सांगितले की गेल्या 30 दिवसांत 2 लाखांपेक्षा जास्त नवीन सिम अॅक्टिव्ह झाले आहेत, हा BSNLविक्रम आहे. फक्त आंध्र प्रदेश नव्हे तर बीएसएनएलचे सब्सस्क्रायबर्स देशातील विविध टेलिकॉम सर्कल्समध्ये मोठ्याप्रमाणात वाढत आहेत.
खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी दरवाढ केल्यानंतर युजर्सनी सोशल मीडियावर बीएसएनएल सिमवर स्विच करण्याची मोहीम सुरु केली. त्याचबरोबर सरकारी कंपनीनं देखील देशातील विविध शहरांमध्ये सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी कॅम्प सेटअप केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE