Breaking News
मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा
नवी दिल्ली - सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आज सादर झालेल्या अर्थसंकल्प २०२४-२४ मध्ये सर्वसमाज घटकांचा विचार केल्याचे दिसत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात करदात्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पात, सरकारने नवीन कर प्रणालीसाठी मानक वजावट म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शन वाढवले आहे. सरकारने स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50,000 रुपयांवरून 75,000 रुपये केली आहे. आता कर्मचाऱ्याच्या पगारातून मिळणाऱ्या करपात्र उत्पन्नातून 75,000 रुपये वाचणार आहेत. म्हणजे या रकमेवर कर आकारला जाणार नाही.
नवी करप्रणाली
मोबाइल फोन, मोबाइल पार्ट्स, बॅटरी, मोबाइल चार्जर
मोबाइल फोन, चार्जर आणि अॅक्सेसरीजवरील बेसिक कस्टम ड्युटी १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
सोने, चांदी आणि प्लॅटिनम
सोने, चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्के, प्लॅटिनमवरील सीमा शुल्क ६.४ टक्के
कर्करोगाची औषधे, एक्स-रे उपकरणे
कर्करोगाच्या उपचारांची तीन प्रमुख औषधे आणि एक्स-रे उपकरणे मूलभूत सीमा शुल्कातून मुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय सरकारने फेरोनिकेल आणि ब्लिस्टर कॉपरवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवली आहे.
मासे आणि मासे उत्पादने
मासे, ब्रुडस्टॉक, कोळंबी, पॉलीकेट कृमी आणि मत्स्यखाद्यावरील सीमा शुल्क ५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.
आवश्यक धातू आणि खनिजे
फेरो निकेल, ब्लीस्टर कॉपर आणि २५ महत्त्वपूर्ण खनिजांवरील मूळ सीमा शुल्क काढून टाकण्यात आले आहे. रेझिस्टर्स (ऑक्सिजन फ्री कॉपर) तयार करण्याचे शुल्कही काढून टाकण्यात आले आहे. लिथियमसह २५ महत्त्वाच्या खनिजांसाठी आयात शुल्कात सूट देण्याची घोषणा केली.
सोलर पॅनेल, चामड्याच्या वस्तू
सोलर पॅनेल तयार करण्यासाठी सूट देण्यात आलेल्या वस्तूंची यादी वाढवण्यात आली असून, चामड्याच्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी करण्यात आले आहे.
प्लॅस्टिक आणि संबंधित वस्तू
सरकारने प्लास्टिक उत्पादने आणि संबंधित वस्तूंवरील सीमा शुल्क वाढवले आहे.
अमोनियम नायट्रेट
अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुल्क ७.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आले आहे.
टेलिकॉम उपकरणे
सरकारने सीमा शुल्क १० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे