रेल्वे स्थानकांचे नावे बदलण्याचा ठराव संमत
रेल्वे स्थानकांचे नावे बदलण्याचा ठराव संमत
मुंबई - विधानसभा निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना जाहिर करण्याची घाई करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहिर करण्यात आली. त्याच धर्तीवर आता मराठी भाषेच्या मुद्यांवरून पुन्हा एकदा मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील रेल्वे स्थानकांना इंग्रज काळातील नावे काढून मराठी नावे देण्याचे नवे कार्ड आज वापरत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मांडला. त्यास विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने पारीत करण्यात आला. या ठरावाला सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडील सदस्यांनी एकमतांने मंजूरी दिली.
कोणत्या स्थानकाचे नाव बदलले
ह करी रोड - लालबाग
ह असँडहर्स्ट रोड - डोंगरी रेल्वे स्थानक,
ह मरीन लाईन्स - मुंबादेवी,
ह चर्नी रोड - गिरगाव,
ह कॉटन ग्रीन - काळाचौकी,
ह डॉकयार्ड रोड - माझगाव रेल्वे स्थानक,
ह किंग सर्कल - तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक
अरविंद सावंत यांनी केली होती मागणी - मध्य रेल्वेच्या स्थानकांची इंग्रजी नावे बदलण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्वप्रथम केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर गेल्या वर्षी तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा ही मागणी लावून धरली. त्यानंतर राज्यविधीमंडळात हा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे