Breaking News
या राज्यात 800 हून अधिक विद्यार्थी HIV +
आगरतळा - त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (TSACS) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये HIV मुळे तब्बल सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे आणि 828 जणांची HIV+ म्हणून नोंदणी झाली आहे. त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीने तब्बल 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थींची नोंदणी केली आहे आहेत जे इंजेक्टेबल ड्रग्स घेतात. इतकेच नाही तर अलीकडील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की जवळपास दररोज एचआयव्हीची पाच ते सात नवीन प्रकरणे आढळून येत आहेत, असे TSACS च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
त्रिपुरा जर्नालिस्ट युनियन, वेब मीडिया फोरम आणि TSACS यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या मीडिया कार्यशाळेला संबोधित करताना, TSACS च्या संयुक्त संचालकांनी त्रिपुरातील HIV च्या एकूण परिस्थितीची आकडेवारी जाहीर केली.
“आतापर्यंत, 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांची माहिती संकलित झाली आहे. येथील विद्यार्थी अंमली पदार्थांचे सेवन करतात. आम्ही राज्यभरातील एकूण 164 आरोग्य सुविधांमधून डेटा गोळा केला आहे. अशी माहिती TSACS अधिकाऱ्यांनी दिली आहे.
HIV बाधित झालेली अनेक मुलं ही सधन कुटुंबातील आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडिल हे सरकार नोकरीत आहेत. पालकांकडून मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत असल्याने मुलांवर नियंत्रण राहिलेलं नाही. ज्यावेळी पालकांना आपली मुलं एड्सग्रस्त आहेत हे कळलं तोपर्यंत फार उशीर झाला होता.
एचआयव्ही/एड्स ही एक महत्त्वाची जागतिक आरोग्य समस्या आहे, याचा थेट संबंध इंट्राव्हेनस ड्रग्सच्या गैरवापराशी आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची एकच सूई अनेकांनी वापरल्याने एचआयव्ही प्रसाराची जास्त शक्यता आहे. ज्यामुळे विषाणू एड्सग्रस्त व्यक्तीच्या शरिरातून रक्ताद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचू शकतं. त्रिपुरामध्ये शाळकरी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये नशेचं व्यसन मोठ्या प्रमाणावर पसरल्याने एड्सचं प्रमाणही वाढलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant