Breaking News
वरळीतील दुर्दैवी अपघात
पुण्यात हिट अँड रनचा प्रकार घडला तसाच मुंबईतील वारली येथे घडला आहे. मुंबईतल्या वरळी हीट अँड रन प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. बीएमडब्ल्यू या आलिशान कारनेमासे विक्रेत्या दाम्पत्याला ठोकर दिली आहे. या अपघातात महिलेला चिरडले असून तिला काही अंतर गाडीने फटाफटन नेले आहे. या घटनेतील त्या दुर्दैवी महिलेचा मृत्यू झाला. या कारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह होता असा आरोप मृत महिलेच्या पटीने केला आहे. बीएमडब्ल्यू चालकाने प्रदीप नाखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांना चिरडले आणि फरपटत नेले. या अपघातात प्रदीप नाखवा बाजूला पडले. यानंतर प्रदीप नाखवा यांनी या अपघाताची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. आक्रोशही समोर आला आहे. या घटनेबाबत पोलीस तपास करीत असले तरी गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रकार होऊ नये,असे वाटते.
मुंबईतील वरळी येथील हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितले की, आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचे आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसेच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेले. विशेष म्हणजे हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वरळीमध्ये आज पहाटे हिट अँड रन प्रकारामुळे मुंबई हादरली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या मासे विक्रेता दाम्पत्याला एका बीएमडब्लू वाहनाने धडक दिली. हे वाहन शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह चालवत असल्याचा आरोप अपघातामधून बचावलेल्या नाखवा यांनी केला आहे.
ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळी मिहीर शाह याच्यासह त्याचा चालक होता. वरळीतील नेहरू तारांगण येथील बस स्टॉपच्या समोरच्या बाजूने जात असताना पहाटे हा अपघात झाला. मिहीरचा फोन सध्या बंद आहे. अपघात झाल्यानंतर बीएमडब्लू वाहनावरील पक्षाचे नाव आणि चिन्हाचे स्टिकर कुणीतरी काढले, असा आरोप करत नाखवा यांनी राजकारण्यांवर जोरदार आसूड ओढले आहेत. मिहीर शाहने अपघाताच्या स्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद करून ठेवला आहे. मिहीर शाह सध्या फरार आहे. तर पोलिसांनी शाह गर्लफ्रेंडला ताब्यात घेतले आहे. मिहीर शाह त्याच्या गर्लफ्रेंडला भेटला होता अशी माहिती समोर येत आहे. अपघातानंतर गाडीवर असलेल्या पक्षाचे चिन्ह खोडून काढण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अपघाताचा हा घृणास्पद प्रकार आहे. वेळीच ब्रेक मारला असता तर त्या महिलेचा जीव वाचला असता.
अपघात प्रकरणी राजकीय पक्षाचे लोक एकमेकांवर टीका करत आहेत. पण मागून हे आरोपींनाच पाठिंबा देतात. आम्हाला कोण वाचवणार? असा उद्विग्न प्रश्न पीडित प्रदीप नाखवा यांनी विचारला आहे. आरोपी मिहिर शाह अपघातानंतर फरार आहे. तर शाह यांचा चालक वाहन चालवत असल्याचे राजेश शाह यांनी म्हटले आहे. ही हाय प्रोफाइल केस असल्याने या प्रकरणावरून आता राजकारणही पेटले आहे. अपघातातील बीएमडब्लू वाहनाने नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर पडले. चालकाने ब्रेक मारताच दाम्पत्य खाली पडले. प्रदीप नाखवा बाजूला पडले, पण दुर्दैवाने त्यांची पत्नी चाकाखाली आली. तेवढ्यात बीएमडब्लूच्या चालकाने तशीच गाडी पुढे नेल्यामुळे महिलेचं मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
अपघात झाल्यानंतर बीएमडब्लू गाडीवरील पक्षाचे नाव, चिन्ह असलेले स्टिकर काढून टाकण्यात आले आहे, असा आरोपही नाखवा यांनी केला. नाखवा यांनी आरोप केलेल्या मिहिर शाहने मध्यरात्रीपर्यंत जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केल्याची माहिती मिळत आहे. सदर पार्टीची पोस्ट मिहिरने त्याच्या इन्स्टाग्रामवर टाकली होती. पोलिसांनी जुहूमधील त्या बारमध्येही चौकशी केली असून त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. मिहिरने मद्यप्राशन केले होते का? अपघातावेळी बीएमडब्लू वाहन नेमके कोण चालवत होते? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतल्यानंतर माध्यमांशी संवाध साधला. त्यांनी म्हटले आहे की, वरळी हिट अँड रनच्या घटनेतील आरोपी चालक फरार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील जो तरुण आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. सध्या हिट अँड रनच्या घटना अनेक शहरांत वाढत आहेत. पुण्यातील घटनेत तर हे प्रकरण मॅनेज करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली होती. तसेच आता या घटनेत होऊ नये ही अपेक्षा !
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE