नकली RPF ला रेल्वे पोलिसांनी केली अटक
नकली RPF ला रेल्वे पोलिसांनी केली अटक
कल्याण - मुंबई-चेन्नई एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने येत असताना एस-1 बोगीत एका सीटवर झोपलेल्या बोगस RPF जवानाला रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रोहन उतेकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. रोहन उतेकर यानंतर जो खुलासा केला तो देखील अतिशय धक्कादायक आहे. सुशील कदम नावाच्या भामट्या व्यक्तीने RPF मध्ये भरती करण्याच्या नावाखाली रोहनसह अनेक तरुणांकडून प्रत्येकी 6 लाख घेतले आहेत. त्यातील अनेकांना आरपीएफचा ड्रेस आणि नकली ओळखपत्र दिले आहेत. पोलीस त्या व्यक्तीच्या शोधात आहे.
कसा सापडला बोगस RPF
मुंबई-चेन्नई एक्सप्रेस कल्याणच्या दिशेने येत असताना एस-1 बोगीत एका सीटवर एक आरपीएफ जवान रोहन उतेकर झोपला होता. टीसीने या आरपीएफ जवानाला औपचारिकता पूर्ण करण्याकरिता त्याचे आयकार्ड मागितले. आयकार्ड पाहिल्यानंतर टीसीच्या लक्षात आले की हा आरपीएफ जवान नाही आहे. टीसीने याची माहिती कल्याण आरपीएफ आणि कल्याण जीआरपीला दिली. कल्याण जीआरपी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले. रोहन हा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील माऊली वस्ती कानगावचा राहणारा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन एका सुशील कदम नावाचा व्यक्तीला भेटण्याकरिता मुंबईला आला होता. या व्यक्तीने रोहनकडून 6 लाख रुपये घेतले आहेत. सुशील कदमने त्याला आरपीएफला कामाला लावण्याचं आश्वासन दिलं होतं. रोहनने केवळ त्याचेच नाही तर त्याच्या आठ नातेवाईकांचे पैसे देखील त्या व्यक्तीला दिले आहे. रोहनची त्या व्यक्तीशी अहमदनगर येथील त्रिदल पोलीस या खाजगी पोलीस अकॅडमीचा डायरेक्टरने करुन दिली होती. या डायरेक्टरने देखील सहा लोकांचे पैसे त्या भामट्याला दिले होते. फक्त रोहन आणि प्रशिक्षण केंद्राचे डायरेक्टरच नाही तर जवळपास 100 पेक्षा जास्त जणांकडून या भामट्याने आरपीएफमध्ये नोकरी लावण्याच्या नावाखाली पैसे उकळले आहेत. आता कल्याण जीआरपी पोलिस आरोपी सुशील कदमचा शोध घेत आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर