Breaking News
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की महिला क्रिकेटपटूंना पुरुष खेळाडूंप्रमाणेच मॅच फी दिली जाईल. कसोटी (रु. १५ लाख) एकदिवसीय (६ लाख रु.)टी२० ३ लाख रु.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घोषित केले आहे की आतापासून सर्व करारबद्ध पुरुष आणि महिला टीम इंडिया क्रिकेटर्सना समान वेतन दिले जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवर शेअर केले की महिला आणि पुरुष खेळाडूंमधील भेदभाव दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. भेदभावाचा सामना करण्याच्या दिशेने बीसीसीआयचे पहिले पाऊल घोषित करताना मला आनंद होत आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन इक्विटी धोरण लागू करत आहोत. लिंग समानतेच्या नवीन युगात जात असताना भारतीय क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी मॅच फी समान असेल.असे शाह यांनी ट्विट केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर