Breaking News
भारतीय नौसेना असुद्या किंवा भारतीय वायुसेना दरवेळेला या सगळ्या फोर्स भारताचे आणि स्वतःच्या खात्याचे नाव मोठं करण्यामध्ये यशस्वी होतातच. यावेळी सुद्धा भारतीय तटरक्षक विभागाने अशीच उत्तमभूत कामगिरी केली आहे. गुजरातमध्ये (Gujrat) भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने (ATS) संयुक्त कारवाईत तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे.
भारतीय तटरक्षक दलाने गुजरात समुद्र किनाऱ्यामध्ये, ६ चालकांसह एक पाकिस्तानी बोट जप्त केली आहे. अल हुसैनी (Al Al Huseini) ही पाकिस्तानी (Pakistan) नाव पथकाने ताब्यात घेतली. हि नाव स्मगलिंग करण्यासाठी गुजरात समुद्र हद्दीमध्ये आल्याचे स्पष्ट सुद्धा झाले आहे. कारण या नावमधून ७७ किलो हेरॉइन (Heroin) जप्त करण्यात आले ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ४०० कोटी रुपये इतकी किंमत आहे. भारतीय तटरक्षक आणि गुजरात एटीएसने केलेल्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा भारतामध्ये गुसखोरी करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant