अष्टपैलू डॉ. परमेश्वर मुंडेनी पटकाविला सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार
शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल बी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलची अंतिम फेरीपर्यंत विजयी घोडदौड सुसाट वेगाने राखण्यात अष्टपैलू क्रिकेटपटू डॉ. परमेश्वर मुंडे यांचा खेळ संजीवनी देणारा ठरला. अंतिम सामन्यात देखील त्यांनी उत्तम गोलंदाजी करीत स्पर्धेमधील प्रतिष्ठेचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमान मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, आरएमएमएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला. उपांत्य फेरीपर्यंत आक्रमक फलंदाजी करून कस्तुरबा हॉस्पिटलचा डोलारा सांभाळणारे डॉ. परमेश्वर मुंडे मात्र अंतिम सामन्यात फलंदाजीमध्ये अपयशी ठरले. ते पायचीतद्वारे लवकर बाद झाल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलचे आक्रमक फलंदाज रोहन जाधव व अंकुश जाधव यांना फलंदाजीत त्यांची साथ लाभली नाही. परिणामी ग्लोबल हॉस्पिटलचे ८७ धावांचे आव्हान केवळ ५ धावांच्या फरकाने कस्तुरबा हॉस्पिटल संघाला गाठता आले नाही.
कस्तुरबा हॉस्पिटलने रहेजा हॉस्पिटलचे आव्हान संपुष्टात आणतांना अष्टपैलू डॉ. मुंडे यांनी केलेली खेळी विशेष गाजली. त्यांनी मर्यादित ४ षटके गोलंदाजीमध्ये एक षटक निर्धाव टाकत १४ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले आणि आक्रमक फलंदाजी करीत ४ चौकार व एका उत्तुंग षटकाराच्या सहाय्याने १३ चेंडूत २७ धावा ठोकल्या. सायन हॉस्पिटल विरुध्द उपांत्य फेरीमधील डॉ. मुंडे यांचा खेळ देखील कस्तुरबा हॉस्पिटल संघाला तारक ठरला. फलंदाजीत डॉ. मुंडे यांनी ५ चौकारांच्या सहाय्याने २१ चेंडूत ३० धावा फटकाविल्या.
सायन हॉस्पिटलचा अष्टपैलू खेळाडू अमोल कुन्जीरची महत्वाची विकेट डॉ. मुंडे यांनी मिळवून दिली. परिणामी १०८ धावांच्या लक्ष्याची शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेली लढत कस्तुरबा हॉस्पिटलने केवळ २ धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलचे अंतिम विजेतेपद थोडक्यात निसटून शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी सर्वोत्तम क्रिकेटपटू डॉ. परमेश्वर मुंडे यांच्या खेळाने बी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा मात्र शिवाजी पार्कात गाजली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant