दीर्घायुष्याचं कारण आतड्यांमधील जीवाणू!
जपानी शास्त्रज्ञांनी शंभर वर्षं आणि त्याहून अधिक काळ जगणार्यांबद्दल एक रहस्य सांगितलं आहे. एवढं दीर्घ आयुष्य लाभण्याला आतड्यांमधले विशेष प्रकारचे जीवाणू असतात, असं संशोधकांना आढळलं आहे.
हा जीवाणू दुय्यम पित्त आम्ल तयार करतो, जे संसर्गाशी लढण्यास मदत करतं. ते आतडं निरोगी ठेवतं आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत करतं. टोकियो ‘केओ युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’ च्या शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे. आतड्यांमध्ये विशेष प्रकारचे जीवाणू आढळतात. त्याला आतड्यांचे बॅक्टेरिया किंवा आतडे मायक्रोबायोम असंही म्हणतात. आपण अन्न खातो तेव्हा हे जीवाणू अन्नघटकांचे तुकडे तुकडे करतात. यामुळे अन्न सहज पचतं आणि अन्नात असलेले पोषक घटक शरीरात शोषले जातात. ते वाईट बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात. आतड्यांच्या जीवाणूंची संख्या कमी होते आणि हानिकारक जीवाणूंची संख्या वाढते तेव्हा अल्सरेटिव्ह कोलायटिससारखे पोटाचे आजार वाढतात.
शास्त्रज्ञांनी १६० वृद्धांवर संशोधन केलं. त्यांचं सरासरी वय १०७ वर्षं होतं. त्यांच्या शरीरात असलेल्या आतड्यांच्या जीवाणूंची तुलना ८५ ते ८९ वयोगटातल्या ११२ लोकांशी आणि २१ ते ५५ वयोगटातल्या ४७ लोकांशी केली गेली. शास्त्रज्ञांना आढळले, की शंभरपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये ८५-८९ आणि २१-५५ वयोगटातील लोकांपेक्षा दुय्यम पित्त सिडचे प्रमाण जास्त होते. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’च्या मते, पित्त आम्ल हाएक द्रवपदार्थ आहे. तो यकृताद्वारे तयार केला जातो आणि ते पित्ताशयात साठवलं जातं. ते पचनाला मदत करते. विशेषतः यकृत सोडल्यानंतर हे चरबीयुक्त अन्न पित्त आम्ल असलेल्या आतड्यांपर्यंत पोहोचतं आणि तिथे उपस्थित आतड्यातले जीवाणू त्याचं दुय्यम पित्त सिडमध्ये रूपांतर करतात. हे दुय्यम पित्त सिड शरीर निरोगी राखण्यास मदत करतं. हे जीवाणू गंभीर आजारांचा धोका कमी करतात. जपानी संशोधकांच्या मतेशंभर वर्षापर्यंत जगणार्यांमध्ये असे विशेष प्रकारचे जीवाणू महत्वाची भूमिका बजावतात आणि गंभीर आजारांचा धोका कमी करतात. संशोधक डॉ.केनिया होंडा म्हणतात की शंभर वर्ष वयोगट आणि आतड्यांमधल्या जीवाणूंमध्ये एक संबंध सापडला आहे; परंतु हे जीवाणू दीर्घायुष्याचं एकमेव कारण आहे हे पूर्णपणे सिद्ध होत नाही. यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. हा जीवाणूंच्या दीर्घायुष्यातला घटक असू शकतो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya