Breaking News
नवी मुंबई ः उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स तसेच होर्डिंग्ज लावून व भिंती रंगवून जाहिराती करु नयेत, तसेच झाडावर कोणत्याही जाहिराती लावून त्यांना इजा पोहचवू नये असे सर्व नागरिक,संस्था, मंडळे यांना पालिकेच्यावतीने सूचित करण्यात येत आहे. याचे उल्लंघन करणार्या संबधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदयांतर्गत फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विनापरवानगी जाहिराती,होर्डिंग्ज,बॅनर्स, पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती नागरिकांनी महापालिकेस देण्यासाठी पुढील प्रमाणे टोल फ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना विनापरवानगी जाहिराती, होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स आढळल्यास त्याची माहिती व छायाचित्रे 8422955912 या मोबाईल क्रमांकावर व्हॉटस अॅपदारे पाठवावीत असे आवाहन पालिकेने केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya