पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात
पुणे येथे महिला दिनाचे औचित्य साधत ‘आम्ही मुंबईकर’चा साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार सोहळा उत्साहात
पुणे (गुरुदत्त वाकदेकर) : साप्ताहिक आम्ही मुंबईकरतर्फे आयोजित साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार २०२६ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी पुणे येथील काकडे देशमुख यांच्या उत्कर्ष शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून हा सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्रातील साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. साप्ताहिक आम्ही मुंबईकरतर्फे अध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटक सौ. वसुधा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सकारात्मक पत्रकारिता जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “आम्ही मुंबईकरचा एक पानांचा अंक आज दहा पानांपर्यंत पोहोचला आहे,” असे सांगत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रातील अनेक पत्रकार आणि साहित्यिकांना आम्ही मुंबईकरचे संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले. त्या योगदानाबद्दल सूर्यवंशी यांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे निलेश दातार यांनी गंगाधर टिपरे यांच्या अभिनयाची नक्कल सादर केली. सादरीकरणामुळे उपस्थितांचे मनोरंजन झाले. प्रिया दामले यांनी ‘शब्द ही कविता’ सादर करत आम्ही मुंबईकर वर्तमानपत्राचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदचंद्र काकडे देशमुख यांनी उत्कर्ष शाळा सुरू करताना आलेल्या अडचणींचा अनुभव सांगितला. प्रास्ताविकात संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी वर्तमानपत्राच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार आणि सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके तसेच ग्राफिक डिझायनर अंगद दराडे यांनी दिलेल्या सहकार्याची त्यांनी कृतज्ञतेने आठवण करून दिली. “अनेक संकटांना तोंड देत आम्ही मुंबईकर पुढे जात राहिला. त्या सातत्यामुळे या नावाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले,” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात योगिता कोठेकर यांच्या संस्कार शिदोरी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन गौरव पुंडे यांनी केले. कार्यक्रमाला श्रीराम घडे, विजय सातपुते, अशोक मोहिते, नंदा सावंत, अनुपमा जाधव आणि दुर्गा पवार उपस्थित होते. युवराज्ञी सोनवणे आणि गौरव पुंडे यांनीही सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.
योगिता कोठेकर, भारत कवितके, स्वाती ताई तोंडे पाटील, तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे आणि सुनील इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांनी कविता सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. मान्यवरांच्या हस्ते साहित्य-सांस्कृतिक पुरस्कार २०२६ चे वितरण करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये प्रज्ञा सिद्धार्थ घोरपडे, अरुण बुंदेले, प्रदीप पंढरीनाथ जोशी, सुनील इंगळे, दुर्गाप्रसाद मिताराव हटवार, अशोक मोहिते, सुभाष बोराडे, अनुपमा जाधव, डॉ. सुरेश भिवाजी पाटील, कु. श्रुती चौधरी, दुर्गा पवार निवघेकर, राकेश साहेबराव वाघ, कवयित्री स्वाती वाल्मिकराव तोंडे पाटील, रफीक इमानदार, मधुकर पुर्णाजी तराळे, गुरुदत्त दिनकर वाकदेकर (मुंबई), बबन विठोबा आराख, प्रा. डॉ. सत्येंद्र संगाप्पा राऊत, मंगेश मुरलीधर दौंडकर, राहूल शिवाजी हांडगर, डॉ. सौ. अलका नाईक, सौ. नंदा विजय सावंत आणि ओंकार शरदचंद्र काकडे देशमुख (युवा खेळाडू पुरस्कार २०२६) यांचा देखील समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. समारोपावेळी योगेश हरणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant