DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू
DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू
मुंबई - विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान प्रवासा दरम्यान गोंधळ घालणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना हाताळण्यासाठी कठोर नियमावली सुचवली आहे. नवीन प्रस्तावात DGCA सर्व एअरलाइन्सना प्रवाशांवर थेट कारवाई करण्याचे अधिकार देत आहे. सध्याच्या नियमांनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांची तक्रार आल्यास आधी चौकशी समिती स्थापन केली जात होती. या काळात एअरलाइन्सना प्रवाशांवर 45 दिवसांपर्यंत बंदी घालण्याची परवानगी मिळत होती. परंतु नवीन नियमांनुसार चौकशी समितीची गरज नाही. DGCA ने आपल्या बदललेल्या नियमांमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. विमानात गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांना एअरलाइन्स आता थेट 30 दिवसांसाठी बंदी घालू शकतील.
एअरलाइन अनेक नियमांच्या उल्लंघनासाठी अशी कारवाई करू शकते. यामध्ये विमानात धूम्रपान करणे, देशांतर्गत विमानात मद्यपान करणे आणि आपत्कालीन दरवाजाचा गैरवापर करणे किंवा लाइफ जॅकेटसारख्या जीवनरक्षक उपकरणांचा परवानगीशिवाय वापर करणे यांचा समावेश आहे. अयोग्य वर्तन करणाऱ्या प्रवाशांवर अपवादात्मक स्थितीत विमान प्रवासावर आजन्म बंदी देखील घातली जाऊ शकते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade