ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे भव्य उद्घाटन
ऑलिंपियन मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे भव्य उद्घाटन
पुणे, - एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम–२०२६) या वर्षातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आठवा हंगाम २३ ते २८ जानेवारी २०२६ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार व ऑलिंपिक कांस्यपदक विजेते मुष्ठीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनएसएनआयएस) उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड तसेच डॉ. सुनीता कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात होणार आहे. या समारंभात पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त तसेच रोईंगमध्ये आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर (व्हीएसएम) यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार असून, ऑलिंपियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपटू विरधवल खाडे तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या पुढाकाराने देशातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी तसेच विविध क्रीडाप्रकारांतून प्रतिभावान खेळाडू घडावेत, या उद्देशाने विश्वनाथ स्पोर्ट मिटची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून सक्षम क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देत राज्यासह देशाच्या क्रीडा संस्कृतीत मोलाची भर घालणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant