स्नेहा मल्लाची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी
स्नेहा मल्लाची निवड राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी
मुंबई - मीरा भाईंदर महापालिकेच्या श्री गणेश आखाड्याची महिला पैलवान स्नेहा मल्लाची निवड वीस वर्षांखालील राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
मुंबई शहर उपनगर जिल्हा तालीम संघ आयोजित मुंबई शहर उपनगर जिल्हास्तरीय अंडर १५ ,१७ व २० कुस्ती स्पर्धा आज मंगळवारी , रेल्वे पोलिस वसाहत , घाटकोपर या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील महिला पैलवान स्नेहा मल्ला हिने अंडर २० वयोगटात ५० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे .
यामुळे स्नेहाची निवड अंडर २० राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धसाठी झालेली आहे. तिने गतवर्षी अंडर १९ शालेय कुस्ती स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला होता तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका – शारीरिक शिक्षण विभाग आयोजित कुस्ती स्पर्धेत देखील ४० किलो वजनीगटात प्रथम क्रमांक मिळविला. कुस्ती च्या सरावा करिता ती बोरिवली ते भाईंदर असा रोज प्रवास करते. तिला आखाड्याचे वस्ताद वसंतराव पाटील तसेच कुस्ती प्रशिक्षक पै.वैभव माने यांचे मार्गदर्शन लाभले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर