जय भानुशाली आणि माही विज घेणार घटस्फोट;
जय भानुशाली आणि माही विज घेणार घटस्फोट; 2026 च्या सुरूवातीलाच मोठी घोषणा
मुंबई: टीव्ही विश्वातील सर्वात क्युट आणि आदर्श मानली जाणारी जोडी, जय भानुशाली आणि माही विज यांच्या चाहत्यांसाठी २०२६ च्या सुरुवातीलाच एक अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या, पण आता खुद्द या जोडीनेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल १४ वर्षांचा सुखाचा संसार मोडून ही जोडी आता आपली वाट वेगळी करणार आहे.
जय आणि माहीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक भावूक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिलं की, "१४ वर्षांच्या या प्रवासात आम्ही अनेक चढ-उतार पाहिले, पण आता आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कठीण होता, पण आमच्या दोघांच्या भविष्यासाठी आणि मुलांच्या हितासाठी हे गरजेचं आहे."
विशेष म्हणजे, वेगळं होऊनही आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी ते नेहमीच एकमेकांचे मित्र म्हणून सोबत राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जय आणि माहीची प्रेमकथा एखाद्या बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नव्हती. एका मित्राच्या पार्टीत त्यांची पहिली भेट झाली, पण तेव्हा फारसं बोलणं झालं नाही. बरोबर एक वर्षानंतर पुन्हा एका क्लबमध्ये त्यांची भेट झाली आणि तिथेच प्रेमाची ठिणगी पडली. जयने एकदा मुलाखतीत सांगितलं होतं की, "माही ही माझी पहिली आणि शेवटची गर्लफ्रेंड होती."
जयने ३१ डिसेंबर २००९ ला माहीला प्रपोज केलं होतं. दोघांनी परदेशात जाऊन ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. २०११ मध्ये त्यांनी अधिकृत लग्न केलं, पण करिअरवर परिणाम होईल या भीतीने आणि मित्रांच्या मस्करीमुळे त्यांनी आपलं लग्न अनेक महिने जगापासून लपवून ठेवलं होतं. एका पार्टीत माही मंगळसूत्र घालून पोहोचली आणि तिथूनच त्यांच्या लग्नाचं गुपित जगाला कळलं.
जय भानुशालीने एका मुलाखतीत खंत व्यक्त केली होती की, त्यांच्या लग्नाला कोणीही आलं नव्हतं. लोकांना वाटायचं की जय हा कॅसानोवा म्हणजेच खूप मुलींशी संबंध ठेवणारा आहे आणि हे लग्न टिकणार नाही. मात्र, जयने तेव्हा ठणकावून सांगितलं होतं की, "माहीने माझं पूर्ण आयुष्य बदललं आहे." आज त्याच आयुष्यातील जोडीदाराची साथ सुटल्याने चाहते सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करत आहेत.
जय आणि माही यांना त्यांच्या मुलांशी प्रचंड ओढ आहे. घटस्फोटानंतरही मुलांच्या भविष्यासाठी ते को-पेरेंटिंग' करणार आहेत. वादाच्या या वळणावरही मुलांवर त्याचा परिणाम होऊ नये, ही या जोडीची प्राथमिकता आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant