Breaking News
उत्सव, परंपरा आणि एकोप्याचा जल्लोष! गोविंदा रे गोपाळा!
मुंबई - दहिहंडीच्या उत्साहात सहभागी होत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांनी त्यांच्या मतदार क्षेत्रात अनेक दहीहंडी कार्यक्रमांना भेट दिली.
“प्रत्येक ठिकाणी गोविंदांचा उत्साह, जोश आणि भक्तिभाव अनुभवला. तरुणाईच्या पराक्रमासोबतच समाजातील एकोप्याची भावना, शिस्तबद्ध आयोजन आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले” असे खरदार संजय पाटील यावेळी माध्यमामंशी बोलताना आपले भावना व्यक्त केली.
खासदार पाटील यावेळी बाळ गोपाळ गोविंदाचे कौतुक करत असे म्हणाले कि ‘या सणाचे स्वरूप केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याची जाणीव करून देणारे आहे, हे पाहून मनोमन समाधान वाटले’.
त्यांनी दहीहंडी उत्सवांचे यशस्वी आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा दिल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar