Breaking News
नारळी पौर्णिमेनिमित्त जुईनगर/नेरुळ मनसेतर्फे खेळी नारळ फोडी - पर्व 2 स्पर्धेचे यशस्वी आयोजन
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक म्हणजेच चांदीचा नारळ जिंकण्याचा मान श्री. प्रकाश सूर्यवंशी यांना मिळाला. द्वितीय पारितोषिक श्री. अभिजीत खापरे तर तृतीय पारितोषिक श्री. भरत कवडे यांना प्राप्त झाले.
महिलांच्या गटामध्ये सुद्धा सहभाग लक्षणीय होता. प्रथम पारितोषिक सौ. भारती गळवे, द्वितीय पारितोषिक कुमारी सूनया गावडे, आणि तृतीय पारितोषिक सौ. कविता पाटील यांना मानाची पैठणी बहाल करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जुईनगर येथील गोविंदा पथकातील काही महिला आणि पुरुष सदस्यांनी पारंपरिक थर लावत सलामी दिली. त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमासाठी संपूर्ण जुईनगर/नेरुळ मनसे टीम कार्यरत होती. कार्यक्रमाचे आयोजक अक्षय लक्ष्मी श्रीकांत भोसले यांनी सुयोग्य नियोजन केले, तर संकल्पना सचिन सुमन वसंत दोरगे यांची होती.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar