Breaking News
HSRP नंबर प्लेटसाठी पुन्हा मुदतवाढ
मुंबई - राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) प्लेट्स बसवण्यासाठीची अंतिम मुदत उद्या (15 ऑगस्ट) संपत आहे. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 70% जुन्या वाहनांवर (High security number plate Maharashtra) अजूनही या प्लेट्स बसवलेल्या नाहीत. ही प्लेट बसविण्यासाठी वाहन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी. त्यानंतर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) न बसविणाऱ्या वाहनांवर 1 डिसेंबर 2025 नंतर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. तथापि, दिनांक 30.11.2025 पर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित वाहन मालकांनी नोंद घ्यावी, तरी एक एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी वाहनावर बसविण्यात यावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे