Breaking News
अभ्युदय शाळेमध्ये मुलीसाठी स्वसंरक्षणाचे धडे
गुन्हेगारी प्रवृत्ती समाजात वेगाने वाढत आहे . त्यासाठी स्वसंरक्षण हे प्रभावी हत्यार प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच अभ्युदय एज्युकेशन शाळेने पुढाकार घेऊन मुलींसाठी कराटे इंडिया ऑर्गनायझेशन चे महाराष्ट्र हेड सुप्रसिद्ध कराटे रेफ्री आणि जज ब्लॅक बेल्ट धारक राजेश गाडे,आणि त्यांचे सहकारी फर्स्ट डॅन प्रवीण कस्तुरे यांनी कराटे मधील काही उपयुक्त स्वसंरक्षणाचे मंत्र दिले विद्यार्थ्यांकडून त्याचा सराव करून घेतला,हाताशी असलेल्या प्रत्येक वस्तूचा उपयोग यावेळी कसा करता येतो याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका क्षितिजा फणसेकर यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar