Breaking News
खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला
पुणे पोलिसांनी पुण्यातील रेव्ह पार्टी वर छापेमारी केल्याची माहिती समोर आली असून उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्क्याचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे.
पुण्यातील या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाचा समावेश होता, अशी माहिती समोर आली. प्रांजल खेवलकर असे त्यांचे नाव असल्याचे समजले आहे. खेवलकरला फ्लॅटमधे पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील खराडी भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमधे पार्टी सुरु होती. प्रांजल खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
प्रांजल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या इतरांना पोलीसांनी वैद्यकीय चाचणीसाठी ससुन रूग्णालयामध्ये नेण्यात आलं आहे. खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती असल्याचे समजले आहे. या सर्वांनी काय घेतलं होतं, अंमली पदार्थ होते का याचा तपास सुरू आहे, तर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला, त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं आहे, त्यांच्या रक्ताची तपासणी सुरू आहे, त्याचबरोबर त्यांनी काही अंमली पदार्थांचे सेवन केले होते का याची तपासणी सुरू आहे. पार्टी सुरू असतानाच पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला यावेळी त्यांना काही प्रमाणात अंमली पदार्थ सापडले.
खेलवलकर हे यापूर्वी त्यांच्या आलिशान सोनाटा लिमोझिन कारवरून चर्चेत आले होते.
खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली होती. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade