Breaking News
रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडी मुंबई अध्यक्ष पदी सोहेल शेख
मुंबई -आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दलित मुस्लिम एकजुटीची ताकद उभारून सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्याची व्यूहरचना यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काम करावे.केवळ दलित नाही तर मुस्लिमांसोबत सर्व जाती धर्मियांना गुजराती हिंदी भाषिकांना ही उमेदवारी देऊन रिपब्लिकन पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत आपली राजकीय ताकद दाखवून देईल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी आज मुंबईत बांद्रा येथे व्यक्त केला.
रिपब्लिकन पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी निवड होताच सोहेल शेख यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची भेट घेऊन आर्शिवाद घेतले. त्यावेळी ना.रामदास आठवले यांनी आगामी मुंबई मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा विश्वास माध्यमांसमोर व्यक्त केला.रिपब्लिकन पक्षात विविध आघाडी उभारण्यात आल्या असून त्यात अल्पसंख्यांक आघाडी ही कार्यरत आहे. अल्पसंख्यांक आघाडी च्या मुंबई अध्यक्षपदी निवड झालेल्या सोहेल शेख यांना आशीर्वाद देत ना.रामदास आठवले यांनी दलित मुस्लिम एकजुटीचे सूत्र मुंबई महापालिका निवडणुकीत राबविण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीचे नवनियुक्त अध्यक्ष सोहेल शेख हे जोगेश्वरीतील रिपब्लिकन पक्षाचे तरुण क्रियाशील कार्यकर्ते आहेत.दलित मुस्लिम एकता परिषदेतुन सोहेल शेख यांनी जोगेश्वरीत चांगले शक्तीप्रदर्शन घडवले आहे.रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन ते मुंबईत चांगले सामजिक कार्य करित आहेत.रिपब्लिकन पक्षात एकनिष्ठ राहुन केलेल्या चांगल्या कामामुळे सोहेल शेख यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अल्पसंख्याक आघाडीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अधिकृतरित्या सोपवण्यात आल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ना.रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइं चे अल्पसंख्यांक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुश्ताक बाबा यांनी सोहेल शेख यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदान केले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्ष पदी सोहेल शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोहेल शेख यांनी पक्षाध्यक्ष ना.रामदास आठवले,सौ.सिमाताई आठवले,अविनाश महातेकर,गौतम सोनावणे,रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,बाळासाहेब गरुड,विवेक पवार,वकार खान,प्रकाश जाधव,मुश्ताक बाबा,रमेश गायकवाड,अजित रणदिवे,संजय पवार,संजय डोळसे,अमित तांबे,हसन शेख,रतन असवारे आदी नेत्यांचे आभार मानले आहेत.मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त मुंबई प्रदेश रिपाइं अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सोहेल शेख यांचे अभिनंदन केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant