Breaking News
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लागू केलेली 30 टक्के भाडेवाढ आता रद्द
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा सण असून दरवर्षी लाखो प्रवासी आपल्या मूळ गावी कोकणात परततात. यावर्षी गणेशोत्सवासाठी एसटीने एकेरी आरक्षणासाठी 30 टक्के भाडेवाढ जाहीर केली होती, मात्र याला जोरदार विरोध झाला. नागरिकांनी सोशल मीडियावरून आणि विविध माध्यमांतून आपली नाराजी व्यक्त केली होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या एसटी प्रवासी आणि चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एकेरी प्रवासासाठी लागू केलेली 30 टक्के भाडेवाढ आता रद्द करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, मुंबई आणि परिसरातील प्रवाशांच्या भावना लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ही भाडेवाढ रद्द करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या आहेत.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाचा सण असून दरवर्षी लाखो प्रवासी आपल्या मूळ गावी कोकणात परततात. यावर्षी गणेशोत्सवासाठी एसटीने एकेरी आरक्षणासाठी 30 टक्के भाडेवाढ जाहीर केली होती, मात्र याला जोरदार विरोध झाला. नागरिकांनी सोशल मीडियावरून आणि विविध माध्यमांतून आपली नाराजी व्यक्त केली होती. प्रवाशांच्या या प्रतिक्रिया गांभीर्याने घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये तत्काळ हस्तक्षेप केला.
पंढरपूर येथे झालेल्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी ही भाडेवाढ रद्द केल्याचे जाहीर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोकणात जाणाऱ्या सामान्य जनतेवर आर्थिक बोजा नको म्हणून हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे. परिवहन विभागाने देखील प्रवाशांच्या सोयीसाठी यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली.
या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा आणि परवडणारा होणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय कोकणातील चाकरमानी आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे