Breaking News
पनवेल ते कर्जत थेट प्रवासाचा मार्ग मोकळा अन् कळवा-ऐरोली रेल्वे धावणार
मुंबई उपनगरीय भागातील कनेक्टिविटी (दळणवळण) सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी)-II, 10,947 कोटी रुपयांच्या एमयूटीपी- III आणि 33,690 कोटी रुपयांच्या एमयूटीपी-IIIए ला मंजुरी देण्यात आली आहे. एक नजर टाकुयात प्रकल्पांवर...
एमयूटीपी- III मध्ये पनवेल-कर्जत, विरार-डहाणू मार्ग चौपदरीकरण, ऐरोली-कळवा उन्नत कॉरिडॉर, विना तिकीट वर्दळ नियंत्रण आणि रोलिंग स्टॉकची खरेदी या विविध कामांचा समावेश आहे. विरार-डहाणू रोड, पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा, बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी व चौथी मार्गिका, आणि रोलिंग स्टॉकची खरेदी ही कामे, शहरी रेल्वे वाहतूक प्रकल्प 50:50 खर्च सामायिकरण तत्त्वावर राबवण्यासाठी, रेल्वे मंत्रालयांतर्गत भारत सरकारची सार्वजनिक कंपनी मुंबई रेल्वे विकास महामंडळ लिमिटेड (एमआरव्हीसी लिमिटेड), आणि महाराष्ट्र सरकार (जीओएम) अमलात आणत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant