Breaking News
धारावीच्या शाळेत दीप पूजनात उजळले युनोस्कोने गौरविलेले शिवरायांचे १२ किल्ले..
मुंबई, – येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि राजे शिवाजी विद्यालयात काल पारंपरिक पध्दतीने दीप आमावस्या निमित्त दीप पूजन करण्यात आले.छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकतेच समाविष्ट केले.याचा आनंदोत्सवही या दीप पूजनाच्या वेळी विद्यार्थी शिक्षकांनी साजरा केला.शिवरायांचे किल्ले म्हणजे शौर्यांची प्रतिके,शौर्यांच्या आजही तेवत राहणाऱ्या ज्योतिच आहेत.असे मानत विद्यार्थी शिक्षकांनी यावेळी दीपज्योति नमोस्तुते बरोबर शौर्य ज्योति नमोस्तुते असे सामूहिकपणे एक सुरात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोषही विद्यार्थ्यांनी यावेळेस केला.
या शाळेच्या हाॅलमध्ये काल कलाशिक्षक विशाल जाधव यांच्यासह त्यांच्या टीमने महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा कुसुमांकित नकाशा काढला.शेकोडी फुले आणि दिव्यांनी हा नकाशा तयार करुन त्यात शिवरायांचे तैलचित्र, शिवरायांच्या बारा किल्ल्यांचे आकर्षक फोटो काॅपी ठेवल्या होत्या .या दिप पुजनाच्या उत्सवात शिवरायांचे हे शौर्यशाली किल्लेही उजळून निघाले.
जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे.
हिंदू संस्कृतीत आषाढ आमावस्या अर्थात दीप पूजनास एक महत्व आहे.या दीप पूजनाचे महत्व त्याच बरोबर शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आले.त्यांचे महत्व आणि शिवरायांचा पराक्रम आणि युध्दनितीची माहिती यावेळेस शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली,असे महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबई संस्थेचे चेअरमन माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील किल्ले हे भव्य स्थापत्यकलेसाठी ओळखले जातात. राजकीय, लष्करी व सांस्कृतिक दृष्टिकोनातूनदेखील हे गड-किल्ले अत्यंत महत्त्वाचे राहीले आहेत.म्हणून या किल्ल्यांबाबतची बारिक सारिक माहिती आमच्या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यावेळेस दिली.
या दीप पूजन आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा युनोस्कोने केलेला गौरव या आनंदोत्सव कार्यक्रमास चेअरमन बाबुराव माने,सचिव दिलीप शिंदे, प्रिन्सिपल स्वाती होलमुखे, प्रिन्सिपल श्रध्दा माने आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar