Breaking News
ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
खा. अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्री सोनवाल यांच्यासोबत बैठक
मुंबई - ससून डॉकमधील मच्छीमारांच्या विस्थापनासंदर्भातील गंभीर प्रश्नावर बुधवारी(23 जुलै रोजी) खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय बंदर व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनवाल यांची नवी दिल्लीत भेट घेऊन मच्छीमार समुदायाच्या समस्या मांडल्या. बैठकीस मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष सुशीलकुमार सिंह हे देखील उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान ससून डॉकमधील गोडाऊन क्र. 158 मधून गरीब मच्छीमारांची वास्तविकता मांडून त्यांना हटवण्याच्या व विस्तापित करण्याच्या अन्यायकारक कारवाईविरोधात खासदार सावंत यांनी तीव्र भूमिका मांडली. यासंबंधी मंत्री सोनवाल यांनी सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद देत कारवाई थांबवण्याचे आश्वासन दिले.
विशेष म्हणजे, 12 जून 2015 रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल, असेही मंत्री सोनवाल यांनी सांगितले. हा निर्णय मच्छीमार समाजासाठी दिलासा देणारा ठरेल, असे खासदार सावंत यांनी सांगितले.
मच्छीमारांच्या न्यायासाठीचा आमच्या लढयाला, संघर्षाला मोठे यश मिळाले आहे, असे खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री श्री. सोनवाल यांचे मनपूर्वक आभार मानले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant