Breaking News
अमली पदार्थांचे व्यसन : भावी पिढीचे भवितव्य धोक्यात
अभ्युदय एज्युकेशन शाळेत काळाचौकी पोलिस ठाण्याच्यावतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
या शिबिरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, पोलीस निरीक्षक शीतल माने व धनंजय व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत सखोल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही अत्यंत घातक ठरते.
कार्यक्रमात व्याख्याते म्हणून आमंत्रित झालेले डॉ. प्रागजी वाजा आणि डॉ. वैशाली शेलार यांनी पोस्को कायद्याअंतर्गत येणारे विद्यार्थी शोषण, अनैतिक व्यवहार, विद्यार्थ्यांचे होणारे शोषण यावर प्रकाश टाकत उपस्थित विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. त्यांनी पालक आणि शिक्षकांनी सजग राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिल स्पेशल सदाशिव गाढे यांनी विशेष मेहनत घेतली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade