Breaking News
MHADA कोकण मंडळाकडून 5,285 घरांसाठी लॉटरी
मुंबई - म्हाडा कोकण मंडळाकडून ५ हजार २८५ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या लॉटरीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. विविध योजने अंतर्गत ही लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीमध्ये ७७ भूखंड असून तब्बल ५ हजार २८५ सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे शहर आणि जिल्हा, तसेच वसईतील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गतच्या सदनिका आणि सिंधुदुर्गातील ओरोस तसेच कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. कोकण विभागाकडून जाहीर केलेली सोडत पाच घटकांत विभागली गेली आहे. २० टक्के सर्वसमावेश योजनेअंतर्गत ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजने अंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १,६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.
वेळापत्रक
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar