Breaking News
अहिल्या विद्यालयाच्यावतीने सामाजिक संदेश देणारी दिंडीचे आयोजन
मुंबई - आषाढी एकादशीच्या दिनानिमित्त अहिल्या विद्यालयाने आयोजित केलेली सामाजिक संदेश देणारी दिंडी अभ्युदयनगरीला परिक्रमा करीत निघाली. “श्री हरि विठ्ठलला'' च्या गजरात, टाळ मृदंगाच्या निनादात आणि माउलीच्या वेशातील बालगोपाळांच्या दर्शनाने परिसर भक्तिमय झाला होता.
या दिंडीचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका कृतिका मोरजकर यांनी केले. त्यांनी अध्यात्मिकतेच्या जोडीला सामाजिक प्रबोधनाचा सुंदर मेळ घालून हा सोहळा अधिक अर्थपूर्ण केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजन-कीर्तनांमधून समाजप्रबोधनाचे विविध मुद्दे, जसे की स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, एकता आणि नशाबंदी यावर सुंदर प्रकाश टाकण्यात आला. छोट्या-छोट्या माउलींच्या मुखातून निघणारे हे संदेश प्रेक्षकांच्या हृदयात रुजत होते.
सदर दिंडीचे काळाचौकी पोलिस ठाण्याच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रागजी वाजा, स्वराज्य फाउंडेशनचे उदय पवार, ज्येष्ठ पत्रकार विजय निरगुडकर, शेखर छत्रे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या ह्या सहभागाचे आणि विद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे भरभरून कौतुक केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade