Breaking News
8 आणि 9 जुलैला राज्यातील सर्व शाळांना सुट्टी
मुंबई,-: महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना अनपेक्षित सुट्टी मिळणार आहे . राज्यातील सर्वच शाळांना येत्या 8 आणि 9 जुलै 2025 रोजी दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारच्या विरोधात पुकारण्यात आलेलं शाळा बंद आंदोलन हे या दोन दिवसांच्या सुट्टीमागचं मुख्य कारण आहे या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ, तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.
खरंतर राज्यातील अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे 8 आणि 9 जुलै रोजी राज्यातील हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत याच कारणांमुळे शाळा बंद असणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade