Breaking News
शिवतीर्थावर येऊ नका.. राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई - राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी गर्दी करत असतात. १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. दरवर्षी राज ठाकरे आपल्या निवासस्थानी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा स्विकारत असतात. मात्र यंदा वाढदिवसाला तीन दिवस अवधी असतानाच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना पत्र लिहित महत्त्वाचे आवाहन केले आहे.
राज ठाकरेंचे आवाहन
तमाम महाराष्ट्र सैनिकांनो आणि हितचिंतकांनो, सस्नेह जय महाराष्ट्र! येत्या 14 जून 2025 ला म्हणजे अर्थातच माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी आपली भेट होणं शक्य नाही, कारण या दिक्शी मी सहकुटुंब मुंबई बाहेर जात आहे. तुमच्या आणि किंवा इतरांच्या मनात हा प्रश्न येईल की मी वाढदिवस साजय का करणार नाहीये 1 काही विशेष कारण आहे का ? इत्यादी पण मनापासून सांगतोय की बरतर असं कोणतंच कारण नाहीये. त्यामुळे येत्या 14 जूनला तुम्हाला भेटता येणार नाही, याचे कोणतेही अर्थ काढू नका.
गेली अनेक दशके माझ्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सगळे जणं येवा, तुमच्याशी त्या दिवशी बोलणं होत नाही पण तुमचं दर्शन, तुमच्या अनेकांशी होणारी भेट हि ऊर्जा देणारी असते. मी आयुष्यात सर्वात जास्त काही कमावलं असेल तर तुम्हा सर्वांच अफाट प्रेम । आणि या प्रेमाबद्दल मी तुमचा आयुष्यभर ऋऋणी आहे आणि पुढे देखील यहीन. या वाढदिवसाला तुमची भेट होणार नाही, यामुळे त्याची मला रुखरुख लागेलच!
पण लवकरच मी तुमच्या भेटीला येईन. महाराष्ट्र सैनिकांना भेटायला, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच. बाकी तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच आणि त्या कायम राहतील याबद्दल तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिक्शी तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवलेत तरी माझा वाढदिवस तुम्ही साजरा केलात असं मी मानेन. त्यामुळे या वर्षी शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकर भेटू. महाराष्ट्राची, मराठी माणसाची तसेच तुमची आणि तुमच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर