Breaking News
DMart मध्ये कोणत्या दिवशी सर्वात स्वस्त समान मिळते? माहितीये का?
Best time to visit DMart: डी मार्ट हे असे ठिकाण आहे जिथे सर्वच वस्तू तुम्हाला एका छताखाली मिळतात. डी मार्टमध्ये गेल्यावर विविध वस्तू, पदार्थांवर खास डिस्काऊंट असतो आणि त्यामुळेच नागरिक येथे खरेदीसाठी गर्दी करतात. दैनंदिन वस्तू असो, खाद्यपदार्थ असो किंवा तर घरगुती उपयोगी वस्तू असो... सर्वच वस्तूंवर डिस्काऊंट मिळतो. अनेकांना वाटते की, डी मार्टमध्ये सर्वच दिवशी एकसारखा डिस्काऊंट असतो. पण तसे नाही. DMart मध्ये वेगवेगळ्या दिवशी सामानाची किंमत किंवा डिस्काऊंट वेगवेगळा असतो. आता तुमच्या मनात प्रश्न उपस्थित झाला असेल की, डी मार्ट मधून सर्वात स्वस्त सामान खरेदीसाठी नेमके कोणत्या दिवशी जावे? जाणून घ्या या संदर्भात अधिक...
किराणा सामान, इलेक्ट्रिक वस्तू, घरगुती वस्तू, खाद्य पदार्थ, कपड्यांपासून ते शालेय उपयोगी वस्तू हे सर्व डी मार्टमध्ये उपलब्ध असततात. बहुतेक सर्वच वस्तूंवर डी मार्टमध्ये डिस्काऊंट असतो आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खरेदीसाठी डी मार्टला पसंती देतात. पण डी मार्टमध्ये कोणती वस्तू कधी स्वस्त मिळते हे तुम्हाला खरेदीला जाण्यापूर्वी माहितीच हवे.
कोणत्या दिवशी सर्वात स्वस्त सामान?
डी मार्टमध्ये विविध वस्तू, पदार्थ हे एमआरपीच्या निम्म्या किमतीत मिळतात. तर कधी-कधी Buy One Get One Free (एकावर एक फ्री) अशा ऑफर्स सुद्धा असतात. नागरिकांना कमी किमतीत चांगल्या वस्तू खरेदी करण्याची संधी डी मार्टमध्ये मिळते.
DMart मध्ये ग्राहकांसाठी काही खास दिवशी खास सेलचे आयोजन करण्यात येत असते. वीकेंड सेल म्हणजेच शुक्रवार ते रविवार या दरम्यान डी मार्टमध्ये ग्राहकांची सर्वाधिक गर्दी असते. अशा दिवशी किराणा सामान, स्किन केअर प्रोडक्ट्स यासारख्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट दिला जातो. इतकेच नाही तर बाय वन गेट वन फ्री अशा ऑफर्स सुद्धा पहायला मिळतात.
रविवार झाल्यावर....
रविवारनंतर जे सामान शिल्लक राहते त्या सामानाची लवकर विक्री व्हावी यासाठी DMart Stores मध्ये सोमवारी क्लीन अप सेल चालवली जाते. या क्लीन अप सेलमध्ये तुम्हाला विविध प्रोडक्ट्सवर अतिरिक्त डिस्काऊंट दिला जातो. पण हा सेल डी मार्टच्या सर्व स्टोअर्समध्ये नसतो.
DMart Ready App
डी मार्टचे अॅप सुद्धा आहे. या डी मार्ट रेडी अॅपवरुन सुद्धा तुम्ही सामान खरेदी करु शकता. तुम्ही या अॅपचा वापर करत असाल तर सोमवार किंवा बुधवारी तुम्हाला ऑनलाईन डील्स किंवा कूपन्स मिळू शकतात. पण या ऑफर्सचा लाभ तुम्हाला केवळ ऑनलाईन ऑर्डर केल्यावरच मिळतो. त्यामुळेच वेळोवेळी डी मार्ट रेडी अॅप तपासत जा जेणेकरुन तुम्हाला वेळीच ऑफर्सबाबत माहिती मिळेल.
डी मार्टमध्ये दररोज MRP पेक्षा कमी किमतीत समानाची विक्री होते. त्यामुळे कोणताही एक दिवस स्वस्त म्हणू शकत नाही. कारण, डी मार्टमध्ये नेहमीच वस्तू स्वस्त दरात उपलब्ध असतात. पण जेव्हा सणासुदीचा काळ येतो... जसे की, गणेशोत्सव, दिवाळी, होळी, न्यू ईयर दरम्यान चांगल्या ऑफर्स, डिस्काऊंट मिळतात. हा काळ खरेदीसाठी उत्तम मानला जातो.
डीमार्टमध्ये वस्तू वेगवेगळ्या डिस्काऊंटमध्ये मिळतात. पण शुक्रवार ते रविवार आणि सणासुदीच्या काळात मिळणाऱ्या ऑफर्स, डिस्काऊंट हा सर्वोत्तम असल्याचं मानलं जातं. तुम्ही थोडं प्लानिंग करुन खरेदी करण्याचा विचार केला तर तुम्ही आपल्या पैशांची मोठी बचत नक्कीच करु शकता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर