NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीण योजनेचे पैसे,

2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकी बहीण योजनेचे पैसे, सरकार पैशांची वसुली करणार ?

: विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली आणि महायुतीचा महाविजय झाल्याचं बोललं जात आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. निवडणुकीपूर्वी सरसकट सर्वच अर्जदार महिलांना पैसे देण्यात आले. मात्र, निवडणुकीनंतर अर्जांची छाननी करण्यात आली आणि अनेक महिला अपात्र झाल्या.

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी अद्यापही सुरूच आहे आणि याच दरम्यान आता सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेत पैसे लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल 2652 सरकरी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवल्याची माहिती उघड झाली आहे.

लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा सरकारी महिला कर्मचारी घेत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. या तक्रारींनंतर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला सामान्य प्रशासन विभागाने 1 लाख 60 हजार कर्मचाऱ्यांचा यूआयडी डेटा उपलब्ध करुन दिला. त्यापैकी नेमक्या किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला याची तपासणी करण्यात आली. यापैकी 2652 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योनजेचा लाभ घेतल्याचं समोर आलं. लोकमत वृत्तपत्राने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

3 कोटी 58 लाख रुपये लाटले

ऑगस्ट 2024 पासून एप्रिल 2025 पर्यंत म्हणजेच 9 महिन्यांत 2652 महिलांनी प्रत्येकी 13,500 रुपयांचा लाभ घेतला. याचाच अर्थ असा होतो की, 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी एकूण 3 कोटी 58 लाख रुपये लाटल्याचं दिसत आहे.

योजनेच्या निकषात बसत नसतााही...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हाच या योजनेच्या संदर्भात काही निकष ठरवण्यात आले होते. या निकषानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, असे असतानाही अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा अर्ज दाखल करुन योजनेचे पैसे लाटल्याचं उघड झालं आहे.

पैसे परत घेणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. एकूण 3 कोटी 58 लाख रुपये या महिलांनी आतापर्यंत घेतले आहेत. आता या महिलांकडून ही रक्कम वसुल केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात सर्व शासकीय विभागांना आदेश देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अनेक महिलांनी घेतला दुहेरी योजनेचा लाभ

लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील 8 लाख 85 हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही सरकारी योजनांचा लाभ घेतल्याची माहिती उघड झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी योजनेचे प्रत्येकी सहा हजार म्हणजेच एकूण 12000 रुपये या महिलांनी घेतले तसेच लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये सुद्धा महिलांनी घेतले. म्हणजेच वर्षाला या महिलांनी 30 हजार रुपये घेतले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट