महागडे शौक पूर्ण करण्यासाठी रेल्वेत प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला
महागडे शौक पूर्ण करण्यासाठी रेल्वेत प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला; सापळा रचून चोरट्याला ठोकल्या बेड्या -
ठाणे : मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना (Mumbai Crime) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढल्यात. चोरी, लूटमारीचे गुन्हेही उघडकीस येत आहेत. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेमध्येही कित्येकवेळा प्रवाशांना चोरट्यांचा (Railway Thief) फटका बसतो. रेल्वेतून प्रवास करत असताना महिला प्रवाशांवर लक्ष ठेवून त्यांच्या मौल्यवान वस्तू आणि दागिने लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. सहिमत अंजूर शेख (वय २९ रा. रबाळे, नवी मुंबई) असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे. तपासादरम्यान त्यानं सांगितलं की, तो आपले महागडे शौक पूर्ण करण्यासाठी तसंच मौजमजा करण्यासाठी चोरी करत होता.
महिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल : कल्याण रेल्वे गुन्हे पथकानं दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास तक्रारदार महिला मंगलोर रेल्वे स्टेशन येथून निझामुददीन एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होत्या. सदरची एक्सप्रेस २३ मार्च रोजी डोंबिवली नजीक कोपर रेल्वे स्टेशनवरुन जात असताना त्यांची उशाखालील पर्स चोरी झाली. यासंदर्भात महिलेनं दिलेल्या तक्रारीवरुन डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305(C) अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
चोरट्याचा शोध सुरू : या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच अशा घटना मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये अनेकदा रात्रीच्या वेळी घडत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं वरिष्ठांनी अशा गुन्ह्यांना पायबंद घालून दाखल गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केलं. त्याला अनुसरून कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकानं साध्या वेशात सापळा रचून गस्त घालत चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
चोरट्याला अटक : गुप्त बातमीदारांकडून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांना आरोपी सहिमत अंजूर शेखची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला बदलापूर शहर हद्दीतून ताब्यात घेण्यात आलं. त्यानं सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. या गुन्ह्यात त्याला अटक करुन पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलं. पोलीस कस्टडीत असताना त्यानं एकूण ६ गुन्हे केल्याची कबूली दिली. चोरी केलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, आयपॅड, घड्याळं असा एकूण ४ लाख ५६ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल या चोरट्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती विजय खेडकर यांनी दिलीय. तसंच रेल्वे प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे