Breaking News
भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड लवकरच !
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नागपुरात येवून सरसंघचालकांची भेट घेतली. ही भेट भाजपचा पुढील अध्यक्ष ठरवण्याच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण भेट मानली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी, पुढील 2029 मध्ये होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप रणनीती आखत असून त्यादृष्टीने नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे ही निवड पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे, मात्र नेमके कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार त्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून कायम करण्यात येतो. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांनंतर पक्षसंघटना मजबूत करण्यावर सध्या भाजप लक्ष देत आहे. 10 कोटी लोकांना भाजपशी जोडण्याचे लक्ष देण्यात आले असताना आता पुढच्या आठवड्यात भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. भाजप स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे