NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मुख्यमंत्री झाले इतिहासकार आणि साधला विरोधकांवर निशाणा

मुख्यमंत्री झाले इतिहासकार आणि साधला विरोधकांवर निशाणा

राजकीय  

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना खऱ्या अर्थाने समा बांधत पानिपतचा इतिहास सभागृहात अक्षरशः जिवंत उभा करत आपण एक उत्तम इतिहासकार आणि प्रवचनकार देखील होऊ शकतो असे दाखवून आपल्या उत्तरात विरोधकांवर जोरदार निशाणा साधत विधानसभा अध्यक्षांना काही अप्रत्यक्ष सल्ले दिले आहेत, यातूनच भविष्यात होणाऱ्या काही गोष्टींची नांदी झाल्याची चर्चा आहे.

अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधक तेच तेच विषय मांडत होते, प्रस्तावात लिहिलेले काही विषय त्यांनी मांडले देखील नाहीत. यामुळे सक्षम विरोधी पक्ष कसा असावा यासाठी मी त्यांना मार्गदर्शन द्यायला तयार आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीलाच लगावला. जळी, स्थळी, काष्ठी , पाताळी विरोधक सगळा दोष मलाच देतात मात्र जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली.माझे सगे सोयरे म्हणजे संविधान आणि जनसामान्य आहेत असे फडणवीसांनी ठणकावून सांगितले.

कोरटकरला अखेर पकडले आहेच, छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चाराणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बलात्कारी आणि दंगेखोर यांच्याबद्दल कोणीही संवेदनशील होऊ नये, त्यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे असेही ते म्हणाले. कोविड काळात दहा हजार हून अधिक कैद्यांची सुटका केली, त्यातील अनेक परत आले नाहीत, आता त्यातील काही अनेक गंभीर गुन्ह्यात सापडत आहेत. सायबर संदर्भातील कोणतीही तक्रार आता १९४५ या क्रमांकावर करता येईल. त्यातून मदत मिळेल.

आतापर्यंत १०,४६७ कोटींचे ड्रग्स जप्त केले, आता शाळेत अमली पदार्थ विरोधी club तयार करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालय मधील मुलांचा यात समावेश करून घेतला जाईल. नक्षलवादाच्या विरोधात मोठी कारवाई सुरू आहे, जुने नक्षलवादी शरण येत आहेत, तसे चाळीस शरण आले आहेत, २०२६ पर्यंत नक्षलवादाचे कंबरडे मोडायचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू झाला आहे. पोलिसांना नव्वद हजार घरं उपलब्ध करून देत आहोत.

गुन्ह्यांची नोंदणी करून देशभरात ती उपलब्ध करुन दिली जात आहे त्यातून देशभर कुठे ही गुन्हेगार गेला तरी तो पकडला जाईल असे फडणवीस म्हणाले.

मंत्री जयकुमार गोरे यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते आमच्यासोबत नसताना घडलेल्या घटनेचं भांडवल करण्यात आलं. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला लाच स्वीकारताना पकडण्यात आलं आहे. तुषार खरात या यू ट्यूब चॅनल चालवणाऱ्या ला अटक झाली, त्यांचे एकमेकांमध्ये झालेलं संभाषण सापडलं आहे. त्यांनी मिळून कट रचला, त्यांना यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक सापडले आहेत. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल तुषार खरात यांना गेले आहेत , त्याचीही चौकशी करण्यात येईल असे जाहीर करत फडणवीसांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

सभागृहाबद्दल ,मंत्र्यांबद्दल वक्तव्य रोज करणारे लोक आहेत, सभागृहाला दिवचण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या एकनाथ शिंदे यांच्या बद्दलची कविता पुन्हा वाचतात, अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, अध्यक्षांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणं आवश्यक आहे असा सल्ला त्यांनी अध्यक्षांना दिला. यातूनच भविष्यात संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर काहीतरी कडक कारवाई अपेक्षित दिसून आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शव विछेदन अहवालात विसंगती आहे, व्हीसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा मात्र नेमलेल्या समितीने अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येईल. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अजिबात सोडणार नाही अशी अनेक उत्तरे त्यांनी विरोधकांनी उपस्थित केल्याप्रश्नांवर दिली.

या सगळ्यांवर कडी केली ती पानिपत इथे स्मारक कशाला या विरोधी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने. फडणवीस यांनी हे स्मारक पराभवाचे नसून मराठ्यांच्या शौर्याचे आहे असे सांगत पानिपतावरील युद्धाची पार्श्वभूमी स्पष्ट करीत संपूर्ण पानिपत युद्धाचे वर्णन करून त्यात झालेल्या चुका नेमक्या काय होत्या आणि त्या पराभवानंतर अहमद शाह अब्दाली इथे न थांबता त्याच्या राज्यात परत गेला आणि अवघ्या दहा वर्षात मराठ्यांनी पुन्हा त्याचा पराभव करून दिल्लीवर आपले निशाण पुन्हा कसे फडकावले याचे रसभरीत आणि मोठ्या आवेशात वर्णन केले, त्यावेळी अनेकवेळा सभागृहात दोन्ही बाजूंनी बाके वाजवून त्यांच्या वक्तव्याला दाद देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यानिमित्ताने हाती एकही कागद न घेता एखाद्या ऐतिहासिक घटनेचे इतके अचूक आणि रसभरीत वर्णन करू शकतात हे त्यांनी सिद्ध करीत सभागृहात अक्षरशः बाजी मारली.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट