Breaking News
रायगडावरील कथित वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याची मागणी
मुंबई - देशातील महापुरुषांच्या स्मारक स्थळाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ऐतिहासिक घटना, स्थानांना कपोलकल्पित कथा जोडल्या जातात. दुर्गराज राजगडावरील शिवरायाच्या समाधी शेजारी असलेली कथिक वाघ्या कुत्र्याची समाधी ही अशीच एक जोडलेली कथा. या बाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत. ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरुन हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. तसं एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.
कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade