Breaking News
इलॉन मस्कच्या नावाने माजी लष्करी अधिकाऱ्याची लाखोंची फसवणूक
मुंबई - फ्रॉड कॉल करून गुंतवणूकीच्या आकर्षक ऑफर्स देवून सेवानिवृत्तांना लुबाडणाऱ्या भामट्यांच्या सध्या सुळसुळाट सुरु आहे. अशाच एका फ्रॉडमध्ये भामट्याने माजी लष्करी अधिकाऱ्याला फोन करून आपण प्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क असल्याचे भासवत गुंतवणूकीची चांगली ऑफर देऊन तब्बल ७१ लाख रुपये लुबाडले आहेत.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, भारतीय लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्याने सांगितलं की, जानेवारी २०२४ पासून मस्क एक्स ऑफिशियल आणि ॲना शर्मन अशा दोन सोशल मीडिया अकाउंट्सने माजी लष्करी अधिकाऱ्याला फॉलो करण्यास सुरुवात केली. यानंतर या माजी लष्करी अधिकाऱ्यामध्ये त्या दोन सोशल मीडिया अकाउंट्सवरून संवाद सुरु झाला. तेव्हा दावा केला की ते एलोन मस्कची आई (‘मेय मस्क) आणि मे मस्कचे व्यवस्थापक अण्णा शर्मन असल्याचं सांगण्यात आलं.
त्यानंतर शर्मनने त्यांना सांगितलं की जर तुम्ही SpaceX मध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला इलॉन मस्क भेटण्याची आणि टेस्ला कंपनीबद्दल तपशीलवार माहिती मिळवण्याची संधी मिळेल. त्याच्या संमतीनंतर त्याला एका अमेरिकन नंबरवर व्हॉट्सॲपवर ॲड करण्यात आलं आणि सांगितलं की इलॉन मस्कही तुमच्याशी इथे बोलतील. यानंतर त्यांना बनावट इलॉन मस्कबरोबर संभाषण करायला लावलं आणि स्पेसएक्स आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं असल्याचा दावा तक्रारीत केला.
दरम्यान, या निवृत्त अधिकाऱ्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर एका खाते क्रमांकावर पैसे पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे मागत राहिले. तसेच अण्णा शर्मन असल्याचा दावा करणाऱ्याने सांगितलं की, जर त्यांनी टेस्लामध्ये आणखी दोन शेअर्स खरेदी केले तर त्यांच्याकडे कार असेल. या आमिषाला बळी पडून या निवृत्त अधिकाऱ्याने शेअर्समध्ये गुंतवणूक केली.
दरम्यान, माजी लष्करी अधिकाऱ्याने तब्बल २२ वेळा रक्कम हस्तांतरित केली. जेव्हा त्यांना त्यांचा नफा काढून घ्यायचा होता, तेव्हा काहीतरी गडबड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे