Breaking News
विधानसभेत एकनाथ शिंदे झाले टार्गेट, कामकाज तहकूब
मुंबई -विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवातीच्या आठ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खाती टार्गेटवर असल्याचे दिसून आले , यातील बहुतांश प्रश्न भाजप सदस्यांनी उपस्थित केले होते. सुरुवात होताच शिंदे किंवा त्यांनी नेमलेले प्रभारी मंत्री सभागृहातच नव्हते त्यामुळे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दहा मिनिटे तहकूब केले.
संबंधित मंत्री इतक्या प्रश्नांसाठी उपस्थित नसतील तर ते खेद जनक आहे अशी नाराजी खुद्द अध्यक्षानी व्यक्त केली यामुळे सत्तारूढ आघाडीत नेमके काय चालले आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबईतील रस्ते निकृष्ट
मुंबईत सुरू असलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची आहेत, संपूर्ण मुंबई खोदून ठेवली आहे, कामे रखडली आहेत या सर्व विषयांवर अध्यक्षांनी सोमवारी बैठक घेण्याचे निर्देश दिले, याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली.
यासंदर्भातील मूळ प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता त्यावर पराग अळवणी, अमित साटम , योगेश सागर, आदित्य ठाकरे, अमित देशमुख , वरुण सरदेसाई आदींनी या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. खुद्द अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपल्या मतदार संघात सुरू असलेली कामे देखील रखडल्याने या खड्डे मुक्त संकल्पनेला गालबोट लागेल असं सांगितले.
यासंदर्भात दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या भावना तीव्र होत्या त्यामुळे आपल्या दालनात बैठक आयोजित करून त्याची सखोल माहिती घेण्याचं जाहीर केले.
होर्डिंग्ज साठी नवीन धोरण
मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या होर्डिंग्ज बद्दल जबाबदार कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्यासह त्याला काळया यादीत टाकण्यात येईल आणि त्यांना आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम वाढवण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबतचा प्रश्न अमित साटम यांनी विचारला होता, त्यावर पराग अळवणी, योगेश सागर, अतुल भातखळकर आदींनी उपप्रश्न विचारले. होर्डिंग्ज साठी नवीन धोरण आखण्यात येत आहे. पालिका हद्दीतील सर्व होर्डिंग्ज चे लेखापरीक्षण करण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर