Breaking News
उपसभापतींवरील अविश्वास प्रस्ताव विधानपरिषदेत फेटाळला
मुंबई - विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावला.
विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची सूचना सभापतींना दिली होती मात्र हा प्रस्ताव स्वीकारण्याच्या विहित निकषांची पूर्तता झालेली नाही आणि पदावरून दूर करण्यासाठी ठोस कारण यात दिलेलं नाही असं सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळताना सांगितलं.मात्र हा प्रस्ताव देताना निकषांची पूर्तता केली असून हा प्रस्ताव मांडू द्यावा आणि मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उबठा पक्षाचे अनिल परब यांनी केली मात्र सभापती आपल्या निर्णयावर कायम राहिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर