विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोट निवडणूक जाहीर
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोट निवडणूक जाहीर
मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून तशा पद्धतीची अधिसूचना आज देशाच्या निवडणूक आयोगाने जारी केली आहे. यानुसार येत्या 27 मार्च रोजी यासाठी निवडणूक होणार असून त्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विधान परिषद सदस्य असणारे आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर , रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच जण नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून गेल्यामुळे त्यांच्या विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 10 मार्च रोजी या निवडणुकीसाठी अधिसूचना काढण्यात येईल. 17 मार्च ही निवडणुकीसाठीचे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे, 18 तारखेला छाननी होईल तर वीस तारखेला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 27 मार्चला मतदान घेण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया 29 मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant