Breaking News
कर्जबाजारीपणात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
मुंबई - महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या नंबरचे कर्जबाजारी राज्य असल्याचं RBI च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी राज्य आहेत. २०२४ मध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून एकूण ८३.३ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. २०१९ मध्ये ४७.९ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते.
२०१९ ते २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर्जवाढ वेगवेगळी होती. २०२४ मध्ये कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे १०९ टक्के आणि १०८ टक्के वाढ झाली. महाराष्ट्राच्या कर्जात ६५ टक्के वाढ झाली.२०२४ मध्ये ८.३ लाख कोटीचे सर्वाधिक कर्ज तामिळनाडूवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून या राज्यावर ७.७ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रावर ७.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. पश्चिम बंगालवर ६.६ लाख कोटी, कर्नाटकावर ६.० लाख कोटी , राजस्थानवर ५.६ लाख कोटी, आंध्र प्रदेश ४.९ लाख कोटी, गुजरात ४.७ लाख कोटी तर मध्य प्रदेश राज्यावर ४.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर